अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचाराचा प्रयत्न; नराधम अटकेत   

दौंड, (प्रतिनिधी) : दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून मुलीला मळद येथील उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करू पाहणार्‍या नराधमाला स्थानिक नागरिकांनी वेळीच पकडल्याने पुढील मोठा अनर्थ टळला आहे. याबाबत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नवनाथ चंद्रकांत रिठे (वय २७, रा. शेरेचीवाडी, ता. फलटण जि. सातारा) याने शुक्रवारी दुपारी ४:४० च्या दरम्यान फिर्यादी यांच्या मुलीचे पुणे-सोलापूर हायवेवरील भागवत वस्ती येथील योगेश भागवत यांच्या किराणा दुकानासमोरून अपहरण केले. त्यानंतर तिला मळद (ता. दौंड जि.पुणे) या गावच्या हद्दीमध्ये असणार्‍या अनन्या हॉटेलच्या अलीकडे उसाच्या शेतात नेऊन बळजबरीने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.यावेळी स्थानिक नागरिकांनी मुलीचा आरडा ओरडा ऐकून त्वरित घटनास्थळी जाऊन पुढील भयानक प्रकार रोखला. यावेळी नराधम आरोपी नवनाथ चंद्रकांत रिठे याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास उरुळी कांचन पोलीस उपनिरीक्षक मीरा मटाले करीत आहेत.

Related Articles